आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Gangarape Offender Face Angar Through Throwing Eggs Tomatos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींवर न्यायालयात अंडे-टोमॅटोंचा मारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार करणा-या तीन आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने शुक्रवारी 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. दरम्यान, राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी किल्ला न्यायालय परिसरात या नराधमांवर टोमॅटो व अंड्यांचा मारा करून संताप व्यक्त केला.


कासीम बंगाली, विजय जाधव, सिराज रेहमान खान यांच्या कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी तिघांना किल्ला कोर्टात आणण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी मोठी गर्दी होती. आरोपी पोलिस गाडीतून उतरताच दबा धरून बसलेल्या महिला कार्यकर्त्यांनी टोमॅटो- अंड्यांचा मारा केला. अनपेक्षित हल्ला आणि घोषणाबाजीमुळे पोलिसही गोंधळले. काही काळ कोर्ट आवारात पळापळही झाली; परंतु आंदोलन आहे असे कळताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.


आरोपींचे कपडे हस्तगत करायचे आहेत. त्यामुळे कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. त्यामुळे न्यायालयाने तिघांच्या कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. दिल्लीतून अटक केलेला सलीम अन्सारीला पूर्वीच कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, कासीम बंगालीच्या कुटुंबियांनीही तो अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केला. मात्र तो फेटाळण्यात आला.


एक आरोपी अल्पवयीन
चांद बाबू सत्तार शेख याच्या जन्मदाखल्यावरून तो अल्पवयीन असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली. त्याला ज्युवेनाइल कोर्टात स्वतंत्रपणे हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


डीएनए नुमन्यात साम्य
पोलिसांनी पीडित तरुणी व पाचही आरोपींचे डीएनए नमुने घेतले होते. त्यांच्या डीएनए नमुन्यात साम्य असल्याचा अहवाल कलीना येथील न्यायवैद्यक शाळेकडून प्राप्त झाल्याचे पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आरोपींविरोधात अधिक सबळ पुरावे जमा झाले आहेत.