आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Gangrape Case : Five Accused Brought In Shaktimill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई सामूहि‍क बलात्कार प्रकरण: पाचही नराधमांची घटनास्थळावर परेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणा-या पाचही नराधमांकडून घटनेची सखोल माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांना बुधवारी दुपारी शक्ती मिल परिसरात नेले होते. पुराव्यात कसलीही कसूर न राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


22 ऑगस्ट रोजी पीडित छायाचित्रकार तरुणीवर सलीम अन्सारी, विजय जाधव, चांद बाबू, सत्तार शेख, मोहंमद कासीम हाफिज शेख ऊर्फ कासीम बंगाली यांनी सामूहिक अत्याचार केले होते. त्यानंतर सर्वजण फरार झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मंगळवारी गुजरातेतील न्यायवैद्यक पथकही हजर झाले आहे. तसेच आरोपींच्या घरांचीही झडती घेतली असून त्यांनी परिधान केलेले कपडेही जप्त करण्यात आले आहेत.


पीडित तरुणीला डिस्चार्ज
पीडित तरुणीस मंगळवारी रात्री जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. प्रकृती चांगली असून तज्ज्ञ डॉक्टरांनी तिच्यावर सर्वोत्तम उपचार केले. तिला मानसोपचारतज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.