आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Gangrape Preplanned, Five Accused Arrested In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील गँगरेप पूर्वनियोजित होता; पाचवा आरोपी दिल्लीत जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायापत्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी रविवारी पाचव्या आरोपीला दिल्लीत अटक झाली आहे. पहाटे मुंबईत अटक करण्यात आलेला आग्रीपाड्यातील सराईत दरोडेखोर मोहंमद कासीम हाफिज शेख ऊर्फ कासीम बंगाली (21) हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता. तरुणीवर त्याने दोन वेळा बलात्कार केला. तसेच कट पूर्वनियोजित होता, असा दावा पोलिसांनी किल्ला कोर्टात केला आहे. घटनेचे छायाचित्रण असलेल्या मोबाइलचा पोलिस शोध घेत आहेत.
दिल्लीतील भारतनगर भागात मुंबई पोलिसांनी सलीम अन्सारी (27) यास अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. बिहारमधील एका व्यक्तीच्या मदतीने सलीम बांगलादेशात पळून जाणार होता. दरम्यान, विजय जाधव, चांद बाबू सत्तार शेख आणि सिराज रहमान खान यांना आधीच अटक झाली आहे. बंगालीसह सिराज खानला कोर्टाने 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांनी गुन्हा कबूल केला.


एकमेकांना बोलावून घेतले
शक्तीमिलमध्ये सायंकाळी 5.30 वाजता तरुणी आली. तेव्हा जाधव, अन्सारी तेथे होते. तिला मिलचा रस्ता त्यांनीच दाखवला. तरुणी फोटो काढत असताना त्यांनी बंगाली व सिराजला बोलावून घेतले. नंतर बंगालीने चांद शेखला मेसेज केला. त्यावरून गुन्ह्याचा कट पूर्वनियोजित होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.


‘मेहमान की खातिरदारी करनी है’, कासीमचा मेसेज
० कटाचा सूत्रधार कासीम बंगालीने ‘मेहमान आये हैं, खातिरदारी के लिए आ जा!’ असा मेसेज पाठवून पाचव्याला बोलावून घेतले.
० तरुणीला आईचा फोन आला तेव्हा मानेवर काच ठेवून त्यानेच धमकावले होते. सर्वप्रथम आणि शेवटी असा दोन वेळा त्याने बलात्कार केला.
० विरोध केल्यास सहका-यास ठार करण्याची धमकी त्याचीच होती. घटनेचे ठिकाण त्यानेच तरुणीला साफ करायला लावले.
० तरुणीची मोबाइलमध्ये छायाचित्रे त्यानेच काढली. कोणाला सांगितल्यास ती इंटरनेटवर टाकण्याची धमकीही दिली.