आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच-याच्या ढिगातील हा फ्लायओवर आता लक्ष वेधून घेतोय मुंबईकरांचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील माटुंगा येथील उड्डाणपूलाखालील विहंगम दृश्य... - Divya Marathi
मुंबईतील माटुंगा येथील उड्डाणपूलाखालील विहंगम दृश्य...
मुंबई- सर्वसाधारणपणे उड्डाणपूलाखाली एक तर भिखा-यांची फौज राहते किंवा कच-यांचा ढीग पडलेला असतो. मात्र, इच्छाशक्ती असेल आणि काही करायचे ठरवले तर सर्व काही शक्य आहे हे मुंबईतील एका उदाहरणावरून दिसून आले. हे उदाहरण आहे मुंबईतील माटुंगा येथील उड्डाणपूलाखालील. येथील लोकांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर फ्लायओवरच्या खाली कच-याच्या ढीगाऐवजी एक सुंदर गार्डन बनविली आहे. या गार्डनचे सुंदर फोटोज सोशल मीडियात वायरल होत आहेत.
काय खास आहे या गार्डनमध्ये...
- डॉ. बाबासाहे आंबेडकर रोडवर बनलेल्या तुळपुळे फ्लायओवरखालील या गार्डनला नंदलाल डी मेहता गार्डन नाव दिले गेले आहे.
- हा मुंबईतील पहिला फ्लायओवर गार्डनयुक्त ठरला आहे.
- काही दिवसापूर्वीच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी या गार्डनचे लोकार्पन केले.
- यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही त्याची पाहणी करून सर्वांचे कौतूक केले.
- या गार्डनमध्ये 600 मीटर राउंडचा जॉगिंग ट्रक बनवला गेला आहे. याला नर्मदा ट्रॅक नाव दिले गेले आहे.
- पांढ-या व गडद पिवळ्या रंगात रात्री ही गार्डन फारच सुंदर दिसते.
- जॉगिंग ट्रॅकवर नीळा रंगाचे दगड लावण्यात आले आहेत. याशिवाय तेथे कायम हिरवीगार राहणारी छोट्या उंचीची झाडे लावण्यात आली आहे.
- पार्कमध्ये बसण्यासाठीही व्यवस्था केली आहे. मार्बल असलेली सीटस लावण्यात आली आहेत.
आधी असायचा कच-याचा ढिगारा-
- या फ्लायओवरखाली पूर्वी खूप मोकळी जागा होती. तेथे नेहमीच कच-याचा ढिगारा आणि अनधिकृत गाड्या पार्क केल्या जायच्या.
- पावसाळ्यात येथील जागेत पाणी साठायचे. त्यामुळे डास निर्माण व्हायचे. त्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. काही लोक हातगाड्या लावायचे.
- यापूर्वी या परिसरात एकही जॉगिंग ट्रॅक नव्हता. ही समस्या पाहून 'वन माटुंगा' ग्रुपने मुंबई महानगर पालिका (बीएमसी)ला संपर्क साधला.
- 'वन माटुंगा' येथील राहणा-या स्थानिक लोकांचा एक ग्रुप आहे. ज्यात हजारो लोग आहेत.
- याच ग्रुपने पालिकेसमोर एक प्रस्ताव ठेवला व महापालिकनेही त्याला मंजूरी दिली.
- काही महिन्यात तेथे सुंदर गार्डन तयार झाली.
सोशल मीडिया में वायरल हुआ पार्क-
- स्थानिक लोकांच्या प्रयत्नामुळे झालेल्या या पार्कचे फोटो फेसबुकवर वायरल झाले आहेत.
- पार्कचे सुंदर फोटो पाहून लोक हे फोटोज शेअर करीत आहेत. तसेच फक्त सरकारी मदतीवर अवबंलून न राहता लोकचळवळीतून बरीच कामे होऊ शकतात असे बोलू लागले आहेत.
- पार्कच्या फोटोजला सोशल मिडियात हजारों लाईक्स मिळत आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मांटुंगा येथील उड्डाणपूलाखालील सुंदर गार्डनचे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...