आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai HC Refuse To Give Verdict On Ban On Cow Slaughter On Bakra Eid

बकरी ईदलाही गोवंश हत्या बंदी कायम राहणार, मुंबई हायकोर्टाची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बकरी ईदला गोवंश हत्या बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायद्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिल्याने बकरी ईदलाही ही बंदी कायम राहणार आहे.
याचिकेत सांगण्यात आले होते, की गोवंश हत्या बंदीच्या नवीन कायद्यामुळे काही समाजांच्या मुलभूत हक्कांवर गदा येणार आहे. यापूर्वीच्या कायद्यात काही प्रसंगी मुभा देण्यात आली होती. त्यावेळी कायद्यात बंदी असली तरी काही प्रसंगी त्यातून सुट दिली होती. पण या नवीन कायद्यात अशी कोणतीही तरतुद नाही. त्यामुळे बकरी ईदनिमित्त किमान तीन दिवसांसाठी गोवंश हत्या बंदी उठविण्यात यावी.
न्यायाधीश अभय ओक आणि व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिका दाखल करणाऱ्याची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. पण गोवंश हत्या बंदीला लगेच स्थगिती देणे योग्य नाही. त्यावर बाजू सविस्तर समजून घ्यावी लागेल. त्यामुळे आताच यासंदर्भात काही निर्णय देता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.