आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai HC Refused To Stay Maharashtra\'s Cow Protection Law

गोवंश हत्याबंदीचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्यच -मुंबई हायकोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र सरकारने घेतलेला गोवंश हत्याबंदीचा निर्णय योग्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा कायदा अवैध ठरवता येणार नाही, असेही सांगितले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाविरुद्ध मिलिंद रानडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हा कायदा योग्य असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने गोवंश बंदीचा कायदा महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर मिलिंद रानडे म्हणाले, की संपूर्ण निकाल वाचल्यावरच पुढील निर्णय घेतला जाईल. गरज भासली तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचारही करु. पण सध्या निकालाचा अभ्यास करणार आहोत.
राज्य सरकारने वटहुकुम काढत गोवंश हत्याबंदीचा कायदा महाराष्ट्रात केला आहे. त्याला काही जणांनी विरोध केला आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी काही संघटनांनी विशाल मोर्चेही काढले आहेत. पण आता न्यायालयाचा निकाल आल्यावर या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.