आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai HC Refuses To Lift Ban On Mumbai Night Life

आधी गाईडलाईन तयार करा, मग नाईट लाईफचा विचार करु -मुंबई हायकोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नाईट लाईफबद्दल निर्णय देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. महिला सुरक्षा, रेस्तरॉं, पब-बार यांच्यासाठीच्या गाईडलाईन्स तयार करा. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईतील नाईट लाईफबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारकडे विचारणा केली होती. नाईट लाईफची नक्की योजना कोणती आहे. त्याबाबत गाईडलाईन तयार करण्यात आल्या आहेत का, असे न्यायालयाने विचारले होते. त्यावर सरकारने अशा कोणत्याही गाईड लाईन तयार केल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने निर्णय देण्यास नकार दिला आहे.
राज्य सरकार गाईड लाईन तयार करीत नाहीत, तोपर्यंत नाईट लाईफ सुरु करण्याचा निर्णय देता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता या याचिकेवर 16 जून रोजी सुनावणी होणार आहे.
मुंबईच्या नाईट लाईफवर असलेली बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. नाईट लाईफला सध्या पहाटे 1.30 पर्यंतची डेडलाईन लावण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि महिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धर्माधिकारी समितीने आतापर्यंत सहा अहवाल राज्य सरकारला सादर केले आहेत. त्यात पब आणि बारमधील महिला वेट्रेसेसवर बंदी घालण्याच्या सुचनेसह 171 शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यातील 109 शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा सुरु करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर सांगितले होते, की या संदर्भातील कायदा चालू वर्षाच्या अखेरपर्यंत बदलला जाणार आहे. त्यानंतर नागरिकांना नाईट लाईफ एन्जॉय करता येईल.