आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत जोरदार पाऊस: रस्‍त्यांवर पाणी, काही भागात वाहतूकीचा खोळंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रात्रभर जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत शनिवारीही अनेक उपनगरात अखंडपणे पाऊस बरसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी थांबले आहे. परिणामी वाहतूकीचा वेग मंदावला आहे. घाटकोपरहून बीकेसीला जाणारा मार्ग, पवई, सायन, मांटुग्यात वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. रेल्‍वे वाहतूकीवरही पावसाचा परिणाम झाला असून लोकल धिम्‍या गतीने धावत आहे. पश्चिम व मध्य रेल्वेची वाहतूक साधारणपणे 15 ते 20 मिनिटांनी उशीरा सुरू आहे.
मुंबईकरांच्‍या नशिबी कसरतच..
पावसाच्‍या पाण्‍याचे महापालिका प्रशासनाकडून योग्‍य व्‍यवस्थापन होत नसल्‍याने मुंबईकराना दरवर्षी रस्‍त्यावर कसरतच करावी लागते. शुक्रवार आणि शनिवारच्‍या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. हिंदमाता व घाटकोपर भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. हार्बर पाठोपाठ पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दरम्‍यान रे रोड व डॉकयार्ड स्टेशन दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दादर, परळ, सातरस्ता भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.
बातम्या आणखी आहेत...