आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Commented On The Present Situation Of Maharashtra

मुंबई उच्च न्यायालयही म्हणते, सध्याचे युग असहिष्णुतेचे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- "सध्या आपण असहिष्णुतेच्या युगात वावरत आहोत,' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सद्य:स्थितीवर भाष्य केले. मुंबईत हाजी अली दर्ग्यातील मजार परिसरात महिलांच्या प्रवेशावर बंदी उठवण्याच्या याचिकेवर कोर्ट सुनावणी करत होते. या भाष्यातून धार्मिक बाबीत हस्तक्षेप न करता हे प्रकरण सामोपचाराने साेडवण्याचे अप्रत्यक्ष संकेतच कोर्टाने दिले.

दर्ग्यातील अंतर्गत मजारपर्यंत जाण्यास महिलांना मज्जाव करण्यात आहे. दर्गा ट्रस्टच्या या निर्णयाविरुद्ध याचिकेवर मंगळवारी न्या. व्ही.एम. कानडे व रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कानडे असहिष्णुतेसंदर्भात म्हणाले, सध्या धार्मिक बाबींसदर्भात घेतलेल्या एखाद्या भूमिकेचा विपर्यास केला जातो. सध्याचे वातावरण धार्मिक विषयासंदर्भात अतिसंवेदनशील बनले असून आपण अशा असहिष्णुतेच्या युगात वावरत आहोत.' पुढील सुनावणी १५ डिसेंबरला होईल.

काय आहे हे प्रकरण : हाजी अली दर्ग्यात मार्च २०११ ते जून २०१२ मध्ये मझारपर्यंत जाण्याची परवानगी विश्वस्तांनी नाकारली होती. त्या विरोधात भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या सदस्या नूरजहाँ नियाझ आणि झकिया सोमेन यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. मात्र संविधानाच्या कलम २६ नुसार धार्मिक ट्रस्टला आपले व्यवहार स्वत:हून हाताळण्याचे अधिकार आहेत. तसेच दर्ग्यात पुरुषांची गर्दी पाहता सध्या महिलांची केलेली व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याचे दर्ग्याच्या ट्रस्टने म्हटले होते.