आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर पत्नी लठ्ठ होणे घटस्फोटाचे कारण ठरत नाही, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नानंतर पत्नीचे लठ्ठ होणे हे घटस्फोटाचे कारण ठरू शकत नाही, असा निर्वाळा देत पतीने दाखल केलेली घटस्फोटासंबंधीची याचिका न्यायमूर्ती ए.एस. ओक यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

सोलापूर येथील वधू- वर सूचक मंडळाच्या माध्यमातून याचिकाकर्त्याचा एका तरुणीशी विवाह जुळला. लग्नानंतर हे दांपत्य पुण्यात वास्तव्यास होते. काही दिवसांनी दोघांत वाद उद्भवला. पत्नीने विवाहापूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे ती लठ्ठ झाल्याचा पतिराजाचा समज होता. शिवाय या शस्त्रक्रियेबाबत आपल्याला माहिती दिली गेली नसल्याचे कारण देत पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली. मात्र, पत्नीचा लठ्ठपणा घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून स्थानिक न्यायालयाने पतिराजाची याचिका फेटाळून लावली.
पतीने नंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले. तिथेही त्याने पत्नी लठ्ठ असल्याने वैवाहिक जीवनाचा आनंद मिळत नसल्याचा युक्तिवाद केला. पत्नी तिचा धर्म पाळत नसल्याचे कारणही त्याने दिले. मात्र, न्यायालयाने पतीची ही याचिका फेटाळून लावली.