आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रभागा पात्रात वीस दिवस धार्मिक कार्याला हायकोर्टाची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ साेलापूर- पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेत राज्य सरकारच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने वर्षातून २० दिवस चंद्रभागेच्या पात्रात धार्मिक कार्य करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या कालावधीत नदीच्या पात्रात प्रदूषण होणार नाही याची दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे.

यंदा अाषाढी यात्रेत नदीपात्रात ३ दिवस राहूट्या उभा करता येतील. आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी या यात्रांच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांमुळे चंद्रभागा नदीत होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने २४ डिसेंबर २०१४ रोजी चंद्रभागेच्या पात्रात धार्मिक कार्ये करण्यास तसेच नदीच्या तीरांवर निवाऱ्यासाठी तंबू तसेच राहुट्या उभारण्यास प्रतिबंध केला होता. मात्र वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता तसेच परंपरा जपण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने न्यायालयाला निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याची विनंती केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आषाढी, चैत्री, माघी आणि कार्तिकी या चार प्रमुख यात्रांसह वर्षातून २० दिवसांसाठी हे प्रतिबंध शिथील करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. हे २० दिवस साेलापूरचे जिल्हाधिकारी ठरवणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...