आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अमरापूरकर मृत्यू; मुंबई पालिकेस नोटीस, प्रकरणाच्या चौकशीचे आयुक्तांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडलेले डाॅ. दीपक अमरापूकर यांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेवर गुन्हा नोंदवण्यास शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुभा दिली. डाॅ. अमरापूरकर यांच्या मृत्युप्रकरणी पालिकेला नोटीस बजावण्यात आली असून याप्रकरणी म्हणणे मांडण्यास दोन आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली.

फेडरेशन आॅफ रिटेलर्स ट्रेडर्स वेल्फेअर्स असोसिएशन या संघटनेने बाॅम्बे हाॅस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डाॅ. दीपक अमरापूरकर यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने मुंबई पालिकेस नोटीस बजावली. अमरापूरकर कुटुंबियांना वाटल्यास ते मुंबई महापालिकेवर पोलिसात गुन्हा नोंदवू शकतात, अशी मुभाही न्यायालयाने दिली. मुंबई पालिकेवर भादंवि कलम ३०४ (अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच डाॅ. अमरापूरकर यांच्या मृत्युस जबाबदार धरून मुंबईतील एका स्वयंसेवी संघटनेस पालिकेने ५० लाख रुपये भरपाई द्यावी, असे आदेश देण्यात यावेत अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. डाॅ. अमरापूरकर हे प्रभादेवी येथील घरी पायी जात  असताना परळ येथील एका मॅनहोलमध्ये वाहून गेले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...