आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Judge VM Kanade Reject Nathuram;s Hearing

नथुराम गाेडसेबाबतच्या सुनावणीस न्यायमूर्तींचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेशी संबंधित संकेतस्थळाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी आपल्यासमोर घेण्यास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी नकार दिला आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या एका संकेतस्थळावर बंदी घाला, अशी मागणी करणारी जनहत याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

सोमवारी ही याचिका दाखल झाल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर आले त्या वेळी "हे प्रकरण माझ्यासमोर सुनावणीसाठी नको,' अशा शब्दांत न्या. कानडे यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या हंगामी मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे-ताहिलरमानी यांना या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवावी लागणार आहे. या याचिकेविषयी विचारले असता याचिकाकर्ते केतन तिरोडकर म्हणाले की, ‘याबाबत आपण मुंबई तसेच पुणे पोलिसांकडे ई-मेलच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानुसार अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. गोडसेचे उदात्तीकरण करणारे हे संकेतस्थळ कुणी नाना गोडसे नामक व्यक्ती चालवत असून त्यांच्यावर भादंविच्या कलम १२१ अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले अाहे,’ अशी माहिती तिरोडकर यांनी दिली. अलीकडेच नथुराम गाेडसे यांची पुण्यतिथी साजरी करण्यावरूनही वाद उद‌्भवला हाेता.