आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court News About Ill Prisoner Apology

आजारी आरोपीच्या क्षमा याचनेवर 15 दिवसांत निर्णय घ्या : हायकोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आरोपीच्या क्षमा याचिकेवर दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक तुरुंग प्रशासनाला सोमवारी दिले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी केसरी अदजानिया (82) याने याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. केसरी याला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. यातील 11 महिने शिक्षा त्याने भोगली आहे. नाशिक तुरुंगात सध्या तो व्हिलचेअरवर आहे. मध्यंतरी अशक्तपणामुळे तो खाली पडला होता. तसेच त्याला अनेक आजाराने ग्रासले आहे, अशी माहिती त्याचे वकिल एन. गव्हाणकर यांनी दिली आहे. तुरुंग प्रशासन आरोपीला एका महिन्यांची विशेष सुटी देऊ शकते, असेही गव्हाणकर यांनी न्यायालयात सांगितले आहे.