आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या जाहिरातींसाठी किती खर्च केला- हायकोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारतर्फे सध्या वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ या जाहिरातींसाठी किती खर्च केला व त्याचा उद्देश काय? याबाबत बुधवारपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकार सध्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करत आहे. राज्य सरकार सरकारी तिजोरीतून प्रसिद्धीसाठी उधळपट्टी करत आहे. राज्यातील अनेक लोकहिताच्या योजना निधीअभावी अपूर्ण आहेत. त्यामुळे अशा जाहिरातींवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका ‍‍शसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. या जाहिरातींवर तब्बल २२९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे, असा माने यांचा दावा आहे.