आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court News In Marathi, Medical Bill, Divya Marathi

बिलांसाठी छळणा-या रुग्णालयांवर कारवाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मेडिकल बिल न भरल्याने रुग्णाची अडवणूक करणा-या किंवा मृतदेह ताब्यात न देणा-या रुग्णालयांवर नियंत्रणासाठी नियम तयार करता येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने एमसीआयकडे केली आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय व प्राची हॉिस्पटलकडून रुग्णांच्या अडवणुकीच्या आरोपांबाबत दोन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
रुग्णालयांना बिले वसूल करण्यासाठीची साह्यभूत ठरणारी यंत्रणा वकिसित करणे व थकबाकीसाठी रुग्णांची होणारी अडवणूक थांबावी म्हणून न्यायालयाने या याचिकांचे जनहित याचिकेत रूपांतर केले. आपले नियंत्रण डॉक्टरांवर आहे, रुग्णालयांवर नाही, अशी माहिती एमसीआयने यापूर्वी दिली होती. रुग्णालयांवर कारवाईबाबत चाचपणी करून त्याची माहिती आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने एमसीआयला दिले. बिलासाठी अडवणूक ही व्यवसायाची अयोग्य पद्धत असल्याचे एमसीआयने म्हटले आहे.