आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court News In Marathi, Public Litigation Petition, Divya Marathi

कैद्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करा - उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - न्यायालयात आरोपींची ने-आण करण्यासाठी पोलिसांचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यासंदर्भात विचार करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या विभागावर फक्त खटला सुरू असलेल्या आरोपींची ने-आण करण्याची जबाबदारी असावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


आरोपींना ने-आण करण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने हा सल्ला दिला. खटल्यांना उशीर होऊ नये, म्हणून प्रत्येक तुरुंग आणि न्यायालयांत व्हिडिओ कॉन्फरंसिंग सुविधा सुरू करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.


या सुविधेमुळे पोलिसांवर असणारा तणाव कमी होईल. त्यामुळे स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने सुचवले आहे; पण यासाठी आधी सरकारला पोलिस दलातील सर्व रिक्त जागा भरणे गरजेचे असल्याचे मतही न्यायालयाने मांडले.