आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित बीचचा प्रचार करा, उच्च न्यायालयाची सरकारला सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुरूड येथील बीचवर १४ विद्यार्थी बुडाल्याच्या पार्श्वभूमीवर बीचवरील सुरक्षेचा मुद्दा उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतला आहे. राज्यात असलेल्या सुरक्षित बीचचा प्रचार करावा, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.
याप्रकरणी दाखल असलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पाटील म्हणाले, "मुरूड येथील दुर्घटनेचा सरकारने बोध घ्यावा. त्यामुळे सुरक्षित बीचचा प्रचार करावा, जेणेकरून सुरक्षित पर्यटनाला चालना मिळेल. जे पर्यटक पहिल्यांदा बीचवर जातात त्यांना समुद्रात जाणे धोकादायक असल्याची माहिती देण्याची व्यवस्था करावी.'