आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाकडून गोविंदाला दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  ‘छाेटे सरकार’ चित्रपटातील एका गीतामध्ये बिहार राज्याची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी गोविंदाला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
 
बिहार राज्याची बदनामी करणारे गीत सादर केल्याप्रकरणी गोविंदाविरोधात १९९७ मध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी गाेविंदाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने गोविंदाला अटकेपासून संरक्षण दिले.
 
बातम्या आणखी आहेत...