आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court Relief For Buildings In Proposed Heritage Precinct

हेरिटेज इमारतींचाही पुनर्विकास करता येणार, श्रेणीवरून मुंबई पालिका परवानगी देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील हेरिटेजच्या परिसरात राहणा-या नागरिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हेरिटेज परिसरातील प्रत्येक इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटीसमोर पाठविण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अशा इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय मुंबई महापालिका घेऊ शकते असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयामुळे शिवाजी पार्क, माटुंगा, चेंबूर भागातील सुमारे 2000 हजार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हेरिटेज कमिटीने तयार केलेल्या यादीत समावेश असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करावयाचा झाल्यास त्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटीकडे पाठविण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला या भागातील स्थानिक नागरिकांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना कोर्टाने हे आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेने 31 जुलै 2012 रोजी एक निर्णय घेऊन मुंबईतील चेंबूर, शिवाजी पार्क व मांटुगा भागासह सुमारे 41 परिसर हेरिटेज साइट म्हणून जाहीर केले होते. त्यापूर्वी मुंबई हेरिटेज कन्झर्व्हेशन कमिटीने 2008 साली मंजुरी वरील सर्व परिसरांना हेरिटेज म्हणून परवानगी दिली होती. मात्र, आता कोर्टाच्या आदेशामुळे या परिसरातील मोठा दिलासा मिळाला आहे.
कोर्टाने काय निर्णय दिला आहे, वाचा सविस्तर पुढे....