आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाने संपकरी प्राध्यापकांना फटकारले; उद्यापासून रुजू होण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तब्बल 96 दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील प्राध्यापकांना शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारले. संपकरी प्राध्यापकांना उद्यापासून (शनिवार) कामावर रुजू होण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत. प्राध्यापकांनी कामावर रुजू झाल्यानंतर परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही कोर्टाने बजावले आहे.

दुसरीकडे, कोर्टाच्या आदेशानुसार कामावर रुजू होणाचे एमफुक्टो संघटने सांगितले आहे. नेट-सेटप्रश्नी सुप्रीम कोर्टातही जाणार असल्याचे एमफुक्टोच्या सूत्रांनी सांगितले आहे. हायकोर्टाच्‍या आदेशानंतर जवळपास 95 दिवसांपासून सुरु असलेले संपाचे नाटृय आत संपले असून विद्यार्थ्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संपकरी प्राध्यापक, व्यापार्‍यांना आवाहन
व्यापारी तसेच प्राध्यापकांनी टोकाची भूमिका घेऊ नये. यात सामान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या दोघांचेही प्रश्न सामोपचाराने सुटू शकतात, तेव्हा संप थांबवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी केले होते.

प्राध्यापकांना 500 कोटी देण्याची सरकारने तयारी केलेली असतानाही संप सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नाही. ज्या प्राध्यापकांनी नेट- सेट केले नाही त्यांना ते करण्यास मुदतही दिली. मात्र, आता पात्रता परीक्षाच नकोत ही प्राध्यापकांची भूमिका कितपत योग्य आहे? असा प्रश्नही पवारांनी विचारला आहे.