आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टाने संपकरी प्राध्यापकांना फटकारले; उद्यापासून रुजू होण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तब्बल 96 दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील प्राध्यापकांना शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारले. संपकरी प्राध्यापकांना उद्यापासून (शनिवार) कामावर रुजू होण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत. प्राध्यापकांनी कामावर रुजू झाल्यानंतर परीक्षा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही कोर्टाने बजावले आहे.

दुसरीकडे, कोर्टाच्या आदेशानुसार कामावर रुजू होणाचे एमफुक्टो संघटने सांगितले आहे. नेट-सेटप्रश्नी सुप्रीम कोर्टातही जाणार असल्याचे एमफुक्टोच्या सूत्रांनी सांगितले आहे.