आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लूर यांना बॉम्बद्वारे जीवे मारण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लर यांना कोर्टात स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. - Divya Marathi
मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लर यांना कोर्टात स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
मुंबई- मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश मंजुला चेल्लर यांना कोर्टात स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकीनंतर हायकोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान, ही धमकी अज्ञाताने फोन करून दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरु केला. हा फेक कॉल असल्याचे समोर येत आहे.
 
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी मुंबई पोलिसांना कंट्रोल रूममध्ये धमकीचा फोन आला. या फोनद्वारे सांगण्यात आले की, मुख्य न्यायाधिशांच्या चेंबरच्या शेजारील रूममध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडविला जाईल अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी सदर माहिती हायकोर्टात दिली व तेथील परिसरात सुरक्षेची वाढ करण्यात आली.
 
धमकी मिळताच बॉम्ब शोध पथक, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तसेच मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टरूमसह आसपास व हायकोर्टाच्या विविध मजल्यावर तपासणी करण्यात आली. पण या तपासणीत बॉम्बशोध पथकाला काही आक्षेपार्ह वस्तू व पदार्थ सापडला नाही. त्यानंतर तासाभराने संपूर्ण तपासणीनंतर मंजुला चेल्लूर यांना कोर्टरूमध्ये कामकाजासाठी पाठविण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...