आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Highcourt Says, Dr.Rajan Velukar Is Not Eligible For Vice Chancellor Post Of Mumbai University

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजन वेळूकर अपात्र; हायकोर्टाचा निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ.राजन वेळूकर हे पदासाठी अपात्र असल्याचे निष्कर्ष मुंबई हायकोर्टाने काढला आहे. डॉ.वेळूकर यांची कुलगुरुपदी चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाल्याचेही म्हटले आहे. माजी कुलगुरु ए.डी. सावंत यांनी दाखल केलेल्या याच‍िकेवर सुनावणी हायकोर्टाने हा निष्कर्ष काढला आहे.

माजी कुलगुरु ए.डी.सावंत यांनी डॉ.राजन वेळूकरांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. नंतर यांनी यासंदर्भात एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कुलगुरु निवडीच्या निकषांची पूर्तता करण्याची पात्रता नसतानाही निवड समितीने डॉ.राजन वेळूकर यांची नियुक्ती केल्याचे सावंत यांनी याचिकेत म्हटले होते. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने डॉ.वेळूकर यांनांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अपात्र ठरवले आहे. तसेच ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, डॉ.राजन वेळूकर यांच्या कुलगुरुपदाची कारकीर्द अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात पद सोडण्याची नामुष्की डॉ.वेळूकरांवर आली आहे. हायकोर्टाने आपला निर्णय सुनावल्यानंतर डॉ.वेळूकर काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाचा कारभार सांभाळण्यात विद्यमान कुलगरु डॉ.राजन वेळूकर हे विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार सांभाळण्यास असमर्थ असून त्यांना तातडीने या पदावरून निलंबित करावे आणि त्यांच्या जागेवर प्रशासक नेमावा अशी मागणी शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्याकडे केली होती.