आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळा घाटात मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रूळावरून घसरले; लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत-लोणावळा दरम्यान ठाकुरवाडीजवळ मुंबई-हैदराबाद रेल्वेचे इंजिन रूळावरून खाली उतरले. - Divya Marathi
कर्जत-लोणावळा दरम्यान ठाकुरवाडीजवळ मुंबई-हैदराबाद रेल्वेचे इंजिन रूळावरून खाली उतरले.
मुंबई/पुणे- खंडाळा घाटात कर्जतजवळ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रूळावरून खाली उतरले होते. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने धावत आहेत. 
 
मंकी हिल-ठाकुरवाडीजवळ घडली घटना
दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाटात रेल्वेच्या मिडल लाईनवर स्टेशन ठाकूरवाडी ते मंकीहील दरम्यान ही घटना घडली. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस कर्जत स्टेशनच्या पुढे असलेले स्टेशन ठाकूरवाडी सोडल्यावर एक बोगदा पार करीत असताना अचानक वरून आलेल्या दगडांमुळे एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून खाली उतरले. ही घटना घडली तेव्हा या एक्स्प्रेसचे इंजिन आणि तीन डबे बोगद्यामधून बाहेर होते तर उर्वरित सर्व डबे बोगद्यातच होते. बाहेर आलेल्या डब्याच्या खाली तसेच दोन डब्यांच्या मधल्या भागात अनेक मोठमोठे दगड अडकले होते. कोसळलेली दरड, वरून पडत असलेला मुसळधार पाऊस, सर्वत्र पसरलेले दाट धुके यामुळे या गाडीने प्रवास करणारे प्रवासी घाबरून गेले होते.
 
एक्स्प्रेस पुन्हा कर्जत येथे 
ही घटना समजताच रेल्वेचे बचाव पथक घटनास्थळी पोहचले आणि बचावकार्य सुरू केले. यात रेल्वे प्रवाशांनीही मदत केली. ट्रेन खाली घुसलेले दगड तसेच पुढे रेल्वे लाईनवर पडलेले मोठमोठे दगड बाजूला करण्यात गाडीतील प्रवाशांनी रेल्वे बचाव पथकाला मोठी मदत केली. शेवटी संध्याकाळी 6 वाजता कर्जत स्टेशन वरून एक इंजिन पाठवून अपघातग्रस्त एक्स्प्रेसचे रेल्वे इंजिन आणि पहिले तीन डबे घटनास्थळी ठेऊन त्यातले प्रवासी इतर डब्यामध्ये ऍडजस्ट करीत ही एक्स्प्रेस पुन्हा कर्जत येथे नेण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...