आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 कोटींची लाच, मुंबईच्या आयकर आयुक्तास अटक, हवाला रॅकेटचा लाच घेण्यासाठी केला वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी.व्ही. राजेंद्र प्रसाद यांना 2 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने अटक केली. - Divya Marathi
मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी.व्ही. राजेंद्र प्रसाद यांना 2 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने अटक केली.
मुंबई  - मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी.व्ही. राजेंद्र प्रसाद यांच्यासह एका हवाला ऑपरेटरला २ कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात सीबीआयने विशाखापट्टणम येथून अटक केली. या प्रकरणी मुंबईतूनही आणखी चौघांना अटक करण्यात आली. यात एस्सार पॉवर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह एका कर्मचाऱ्याचा, एक सनदी लेखापाल आणि आणखी एका हवाला ऑपरेटरचा समावेश आहे. विशेष म्हणजे हवालामार्फत लाच स्वीकारण्याची एक नवी पद्धतच या प्रकरणातून समोर आली.
 
८ जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी ८ जणांविरोधात गुन्हे दाखले झाले. यात राजेंद्र प्रसाद , बालाजी ट्रस्ट व एस्सार इन्व्हेस्टमेंट ट्रस्टी, सनदी लेखापाल श्रेयस पारीख व गौतम चोक्सी, एस्सारचा कर्मचारी प्रदीप मित्तल व विपीन वाजपेयी, हवाला ऑपरेटर सुरेश जैन आणि मनीष जैन यांचा समावेश आहे.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा... 2 महिन्यांपासून सीबीआयची नजर होती... 8 जणांविरोधात गुन्हा दाखल...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...