आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Indian Submarine Sindhurakshak Catches Fire At A Naval Dockyard

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत सिंधुरक्षकसह दोन पाणबुड्यांत आग; एकापाठोपाठ तीन स्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या कुलाबास्थित नौदलाच्या डॉकयार्डमध्ये मंगळवारी मध्यरात्री 12च्या सुमारास भीषण आग लागली. आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीत सर्वप्रथम आग लागली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नंतर तीन स्फोट झाले आणि आगीचे लोळ उठले. पाठोपाठ शेजारी उभी दुसरी पाणबुडीही पेटली.

दोन्ही पाणबुड्यांत तैनात जवानांनी आग लागताच पाण्यात उड्या मारल्या. त्यांना उपचारांसाठी अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, डॉकयार्डमध्ये 20 हून अधिक अग्निशामक बंब पोहोचले असून तासाभरात आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप कळले नसले तरी नौदलाचे प्रवक्ते पी. व्ही. एस. सतीश यांनी दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता फेटाळून लावली.

तीन महिन्यांपूर्वी या पाणबुड्यांत सुधारणा करून या डॉकयार्डमध्ये आणल्या होत्या. सिंधुरक्षक पाणबुडी रशियन बनावटीची असून तिची निर्मिती सेंट पीटर्सबर्गमध्ये 1997 मध्ये करण्यात आली आहे. 2300 टन वजनाच्या या पाणबुडीची किंमत सुमारे 490 कोटी रुपये आहे. 2010 मध्ये याच पाणबुडीत आग लागून खलाशाचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2011 मध्ये मुंबईतच आयएनएस विंध्यगिरी पाणबुडीत आग लागली होती.