आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वानखेडेवर 15 हजार चाहत्यांच्या उपस्थितीत \'MI\'ने साजरा केला विजयोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेप्सी कपसोबत सचिन आणि रायडू.... - Divya Marathi
पेप्सी कपसोबत सचिन आणि रायडू....
मुंबई- चेन्नई सुपरकिंग्जसारख्या बलाढ्य टीमला चारीमुंड्या चीत करीत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आठव्या मोसमातील विजेतेपद पटकावले. मुंबईचे हे दुसरे विजेतेपद ठरले आहे. याआधी 2013 साली मुंबईने चेन्नईलाच पराभूत करून पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. आताही तसेच घडले आहे. यंदाच्या मोसमात मुंबईने पहिल्या सत्रात पहिले सलग चार सामने गमावले होते. त्यामुळे मुंबई प्लेऑफमध्येही जाणार नाही अशी सर्वांची धारणा होती. मात्र, मुंबईने व त्यांच्या फॅन्सनी आशा सोडली नव्हती.
संघाची कामगिरी खराब होत असतानाही मुंबईचे पाठीराखे आपल्या संघाला चिअर करण्यासाठी मैदानात हजर राहत होते. पाचव्या सामन्यात मुंबईने संघात काही बदल केले व विजयाचे खाते खोलले. त्यानंतर मुंबईने पाठीमागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर झालेल्या 10 सामन्यापैकी तब्बल 9 सामने मुंबईने लागापोठ जिंकले. अखेर रविवारी मुंबईने कोलकात्यात चेन्नईला हरवून यंदाच्या मोसमातील विजेतेपद पटकावले. याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई इंडियन्सने सोमवारी रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम फक्त आपल्या चाहत्यांसाठी व पाठीराख्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
सोमवारी रात्री आठ वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाला सर्वांना मोफत प्रवेश दिला होता. 33 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमध्ये 15 हजार मुंबईचे चाहते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन नीता अंबानी, त्यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्यासह सचिन तेंडूलकर, रिकी पॉटिंग, जोन्टी -होडस, अनिल कुंबळे, रॉबिन सिंग, शेन बॉन्ड आदी सपोर्ट स्टाप उपस्थित होता.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकल्यानंतर केलेला जल्लोष.... अनेक सेलिब्रेटींनी लावली मैदानात हजेरी.. पाहा क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...