आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL :मुंबईकडून केकेआरचा पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल-6 मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सचा 65 धावांनी पराभव केला. हरभजन सिंग (3/27), एम.जॉन्सन (2/13) आणि प्रज्ञान ओझा (2/23) यांनी घातक गोलंदाजी करून मुंबईला वानखेडेवर शानदार विजय मिळवून दिला. यजमान टीमने 12 सामन्यांत आठवा विजय मिळवून गुणतालिकेत 16 गुणांसह दुस-या स्थानावर धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 6 बाद 170 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने 18.2 षटकांत अवघ्या 105 धावांवर गाशा गुंडाळला. कोलकात्याचा 12 सामन्यांत हा आठवा पराभव ठरला.


धावाचा पाठलाग करणा-या केकेआरकडून जॅक कॅलीस 24 , युसूफ पठाण 13 , बिस्ला 17 व डी.दासने 23 धावा काढल्या. गोलंदाजीत हरभजनने चार षटकांत 27 धावा देत तीन बळी घेतले. तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 170 धावा काढल्या. बालाजीचे पहिलेच षटक तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ड्वेन स्मिथने निर्धाव खेळून काढले आणि मुंबईकरांचा आवाज वानखेडे स्टेडियममध्ये गुंजलाच नाही. मॅक्लारेनच्या गोलंदाजीवर दोन सणसणीत स्ट्रेट ड्राइव्ह मारून स्मिथने प्रेक्षकांना जागे केले. नंतरच्या षटकात सचिन तेंडुलकरने पाच चौकार मारले आणि आयपीएलचा धमाका वानखेडे स्टेडियमवर होत असल्याची पहिली जाणीव झाली. सचिनने एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून ड्राइव्ह मारला, कव्हर्समधून चेंडू सीमापार केला, पूल केला आणि स्लीपमधून एकदा चेंडू सीमापार केला. मात्र, सचिनने त्यानंतर बॅट म्यान केली. स्मिथने दुस-या टोकाकडून फटकेबाजी सुरू ठेवली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील पहिली मोठी सलामी देता आली. मात्र, 14व्या षटकात धावांचे शतक पूर्ण करणा-या मुंबईला त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरील आपल्या यापूर्वीच्या मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य मात्र गाठता आले नाही.


सचिन तेंडुलकर (48) आणि स्मिथ (47) ही मुंबईची सलामीची जोडी धावांचे शतक पूर्ण होण्याआधीच तंबूत परतली. सचिनने 28 चेंडूंत 8 चौकारांच्या साहाय्याने 48 धावा फटकावल्या, तर स्मिथने 53 चेंडूंत 47 धावा फटकावताना 7 चौकार मारले.


सचिनने उडवला धमाका
सचिन तेंडुलकरने केकेआरविरुद्ध सामन्यात तुफानी फटकेबाजी केली. त्याने डी. स्मिथने 93 धावांच्या भागीदारीचा धमाका उडवला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना सामन्यात 15 चौकार ठोकले. सचिनने 28 चेंडूंत आठ चौकारांसह 48 धावा काढल्या. त्याला रजत भाटियाने त्रिफळाचीत केले. स्मिथने 53 चेंडूत सात चौकार ठोकून 47 धावा काढल्या. त्याला इकबाल अब्दुल्लाने झेलबाद केले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : 6 बाद 170 धावा (स्मिथ 47, सचिन 48, कार्तिक 34, 2/60 मॅक्लॉरेन) वि.वि. कोलकाता नाइट रायडर्स : सर्वबाद 105 (बिस्ला 17, कॅलीस 24, 3/27 हरभजन,2/13 जॉनसन)