आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ४५,००० कोट्यधीश, ५५ लाख कोटी संपत्ती, देशातील सर्वात श्रीमंत महानगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी आणि जगभरातील पर्यटकांची लाडकी मुंबई देशात सर्वांत श्रीमंत शहर, तर जगात १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. मुंबईतील लोकांकडे एकूण ५५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे.
या महानगरात ४५,००० कोट्यधीश आणि २८ अब्जाधीश राहतात. यानंतर दिल्ली दुसरे तर बंगळुरू तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार ही एकूण संपत्ती म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची खासगी संपत्ती होय. यात त्यांची सर्व संपत्ती, रोख, शेअर बाजारातील गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. यातून देणी वगळण्यात आली असून सरकारी निधी वेगळा ठेवण्यात आला आहे. अहवालानुसार, येत्या दहा वर्षांत भारतात रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, आयटी, स्वास्थ्य, मीडिया या क्षेत्रांत चांगली वृद्धी होईल. नफाही वाढेल.
चेन्नईपेक्षा पुणे श्रीमंत
४ महानगरांपैकी फक्त चेन्नईचा टाप-५ श्रीमंत शहरांत समावेश नाही. हे शहर ७ व्या स्थानी आहे. येथील लोकांपेक्षा अधिक संपत्ती पुण्यातील लोक बाळगून आहेत. मात्र, चेन्नईत २,३०० कोट्यधीश अधिक आहेत.
पुढे वाचा, मुंबईच्या श्रीमंतीबाबतचे काही Facts..
बातम्या आणखी आहेत...