आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जियो पारसी\' जाहिरातीतून वादग्रस्त सल्ला - आज रात्री कंडोमचा वापर टाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पारशी समुदायाची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. या समुदायाला लोकसंख्या वाढीसाठी प्रेरित करणारी जाहीरात केंद्र सरकारने तयार केली आहे. 'जियो पारसी' या थिमने तयार करण्यात आलेल्या काही जाहीराती वादात अडकल्या आहेत. या जाहीरातींमध्ये कंडोम वापरावर बंदी घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय, पारशींनी लग्न करुन मुलांना जन्म दिला नाही तर, लवकरच पारशी कॉलनीचे हिंदू कॉलनीत रुपांतर होईल, असेही म्हटले आहे.
का केली जात आहे जाहिरात
देशाच्या लोकसंख्येत पारशींची संख्या चिंताजनक कमी आहे. पारशींच्या दिवसेंदिवस कमी होत जाणार्‍या लोकसंख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक मंत्रालयाने सप्टेंबर 2013 मध्ये एक योजना तयार केली. त्यासाठी मंत्रालयाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सोमवारपासून या योजनेंतर्गत जाहीराती सुरु झाल्या आहेत. त्यासोबतच या योजनेंतर्गत ज्या जोडप्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना व्हिट्रो फर्टिलायझेशन सारख्या सुविधांसाठी मोफत मदत केली जाणार आहे. या योजनेंतर्गत गैर पारशी महिलेने पारशी पुरुषासोबत लग्न केलेले असले पाहिजे. पारशी महिलेने आंतरधर्मीय विवाह केल्यास तिला याचा फायदा मिळाणार नाही.
किती आहे पारशी लोकसंख्या
मुंबईमध्ये फक्त 40 हजार पारशी शिल्लक आहेत. 2001 च्या जनगणनेनुसार ही संख्या 70 हजार होती. पारशी लोकांचा वार्षीक जन्मदर 200 आहे, तर 800 आहे. पारशी समुदायाची संख्या कमी असण्याचे प्रमुख कारण त्यांच्यात उशिरा होणारे विवाह. त्याशिवाय अनेक जण अविवाहित राहाण्यालाच पसंती देतात किंवा एकच अपत्य राहु देतात आणि धर्माबाहेर लग्न करण्यामुळे पारशींची संख्या कमी झाली आहे.
काय आहे, जाहीरातमध्ये
जाहीरातीमध्ये चाळीशी पार झाल्यानंतरही आईसोबत राहाणार्‍या अविवाहित पुरुषांची टिंगल उडवली गेली आहे. त्याशिवाय योग्य पुरुषाच्या शोधात लग्नाचे वय होऊन गेलेल्या महिलांवरही या जाहीरातींतून निशाणा साधण्यात आला आहे. अशा प्रकारच्या 20 हून अधिक प्रिट जाहीराती प्रसिद्ध झाल्या आहेत.
ज्या पारशी दाम्पत्याला अपत्य नाही त्यांना सरकारकडून मोफत उपचार करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वानगी दाखल काही जाहीरातींच्या टॅग लाइन पुढील प्रमाणे आहेत.
- 'जबाबदार बना, आज रात्री कंडोमचा वापर टाळा!'
- 'तुमचा बॉयफ्रेंड काय रतन टाटांसारखा यशस्वी होणार आहे? त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणार्‍या तुम्ही कोण आहात, निकोल किडमॅन?'
- 'तुम्ही तुमच्या आई सोबत ब्रेकअप घेण्याची ही योग्य वेळ नाही का?'
पारशी समुदायाच्या इतिहासावर संशोधन करत असलेल्या मुंबईच्या सिमिन पटेल यांनी या जाहीरातींवर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, 'या जाहीरातींमधून महिलांवर दबाव टाकला जात आहे, की महिलांचे आयुष्य लग्न आणि मुले याशिवाय अपूर्ण आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वादग्रस्त जाहीराती