- Marathi News
- Mumbai, Kolhapur Toll Very Soon Stop Chief Minister
ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई, काेल्हापूरचा टाेल लवकरच बंद : मुख्यमंत्री
नाशिक जिल्ह्यातील येवल्याजवळील काेपरगाव रस्त्यावरील टाेल नाका साेमवारपासून बंद झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पेढे वाटून टाेलमुक्तीच्या निर्णयाचे स्वागत केले.
मुंबई - यापूर्वी दिलेल्या अाश्वासनानुसार १ जूनपासून राज्यातले १२ टोल नाके बंद करण्यात अाले अाहेत. तसेच ५३ टोल नाक्यांवर छोट्या गाड्यांना टोलमुक्ती देण्याच्या निर्णयाचीही अंमलबजावणी सुरू केली अाहे. आता कोल्हापूरातील टोल व मुंबईच्या चारही एंट्री पॉइंटवरील टोल नाके राज्य सरकार लवकरच बंद करणार अाहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिली.
‘मुंबई एंट्री पॉइंटवरील टोल नाक्यांबाबत झालेल्या कंत्राटामध्ये बायबॅकची अट नसल्याने हे टोल बंद कसे करता येतील यावर आम्ही विचार करत आहोत. याबाबत लवकरच निश्चित मार्ग काढला जाईल. ज्या टोल नाक्यांच्या कंत्राटात बाय बॅक पॉलिसी आहे त्यांना पैसे देऊन राज्य सरकार टोलमुक्ती करीत आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जास्त बोजा पडणार नाही. याचे कारण एवढेच की, टोल कंत्राटदारांनी जेव्हा कॅश फ्लो दाखवला तेव्हा तो कमी दाखवल्याने त्या आधाराने आम्ही पैसे परत करणार आहोत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले, ‘काही टोल नाक्यांवर एक हजार कोटी रुपये कॅश फ्लो असला तरी ठेकेदारांनी हुशारी करीत ३००-४०० कोटी रुपये कॅश फ्लो दाखवला. त्यांची ही हुशारीच त्यांच्या अंगलट अाली अाहे,’ असे ते म्हणाले.