आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागचा राजाच्या निरोपासाठी मुंबईत उसळला जनसागर, 20 PHOTOS मधून पाहा मिरवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘गणपती बाप्पा मोरय्याऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ'च्या जयघोषात काल (मंगळवारी) राज्यभरात लाडक्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. लालबागच्या राजासह मुंबईत प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला अलविदा म्हटले.

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईतील रस्त्यावर जनसागर उसळला होता. रात्रभर मिरवणूक काढून आज (बुधवारी) सकाळी लालबागच्या राज्याचे विजर्सन झाले.

#बॉलिवूड सेलिब्रिटीज दर्शनाला...
- गणेशोत्सवादरम्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
- अनंत चतुदर्शीच्या पूर्व संध्येला बच्चन फॅमिली, कपूर फॅमिलीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी बाप्पाचे दर्शन घेतले.

#5.3 कोटी रुपयांचे दान
- यंदा 11 दिवस चाललेल्या गणेशोत्‍सवादरम्यान लालबागचा राजाला रोख रक्कम 5.3 कोटी रुपयांचे दान मिळाले आहे.
- यासोबतच 5.5 किलोग्रॅम सोने व 71 किलो चांदीचेही दान मिळाले आहे.  
- मागील वर्षी बाप्पाला 4 कोटी रुपयांचे दान मिळाले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून 20 PHOTOS मधून पाहा... मुंबईतील गणेश विजर्सन मिरवणूक...
 
बातम्या आणखी आहेत...