आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत रेल्वे सेवा विस्कळित, दिव्यात दगडफेक, महिलेची रेल्वे डब्यात प्रसूती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. मध्य रेल्वेवर याचा सर्वाधिक ताण पडला आहे. त्यामुळे नोकरीवर जाणा-या लोकांची प्रचंड वाताहत झाली. सीएसटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून वळविण्यात आली आहे.
जोरदार पाऊस पडल्यानंतर आज सकाळी पाऊस थांबला मात्र रेल्वे सेवा विस्कळित झाली. त्यामुळे चाकरमान्यांचे सकाळपासून हाल झाले. हार्बर, पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या आता 20 ते 25 मिनिटाने उशिरा धावत आहेत.
दिव्यात दीड तासापासून लोकल नाही, संतप्त प्रवाशांची दगडफेक-
दरम्यान, मध्य रेल्वेला सर्वाधिक फटका बसल्याने या मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. दिवा रेल्वे स्थानकात दीड तास एकही लोकल गाडी न आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रूळावर उतरत येणा-या रेल्वेवर दगडफेक केली. गाडीत बसलेल्या प्रवाशांनी संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन खिडकीच्या काचा बंद केल्या. त्यामुळे जखमी होणासारख्या घटना टळल्या. मात्र त्यानंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे स्थानकाची नासधूस केली.
महिलेची रेल्वेच्या डब्यातच प्रसूती-
मुंबईल तीन्हीही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असतानाच, मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप स्टेशनजवळ लोकलच्या डब्यात एका महिलेची प्रसूती झाली. गुडिया प्रमोद गुप्ता असे या महिलेचे नाव असून त्यांनी डब्यातच बाळाला जन्म दिला. गुडिया गुप्ता या दिव्याहून सीएसटीकडे चालल्या होत्या. मात्र आज सकाळपासूनच रेल्वे सेवा ठप्प झाल्याने गुडियाला वेळेत दवाखान्यात जाता आले नाही. त्यामुळे लोकलच्या लगेज डब्यात प्रसुत होण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. यानंतर गुडियाला सावित्रीबाई प्रसुती गृहात दाखल केले गेले आहे.
पारसिक बोगद्याचा भाग कोसळला-
दरम्यान, मुंब्रा येथील उदयनगर परिसरातील मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील पारसिक बोगद्याच्या वरील डोंगराचा काही भाग ढासळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे अग्नीशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहेत.
पुढे पाहा, या घटनेतील छायाचित्रे व व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...