आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Live Today, Whats Happened & Whats Going On Maharashtra

MAHARASHTRA TODAY: धनंजय मुंडे राज ठाकरेंच्या भेटीला, मोहन रावले राष्ट्रवादीत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज राज ठाकरेंच्या भेटींसाठी कृष्णकूंजवर धाव घेतली. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना मनसेने मदत करावी अशी विनंती करण्यासाठी मुंडे यांनी राजचे घर गाठले. मात्र भेटीतील तपशील समजला नाही. दुसरीकडे, शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार मोहन रावलेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला.
खाली वाचा दिवसभरात काय-काय घडले महाराष्ट्रात...
- माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुलेंचा काँग्रेसवर हल्लाबोल: रायगडमध्ये काँग्रेस नावालाही राहिली नाही. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू असे वक्तव्य केल्याने काँग्रेसला धक्का, रायगड व मावळमध्ये अंतुले गटाचा शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे जयंत पाटलांची माहिती...
- नांदेडचे विद्यमान खासदार भास्करराव खातगांवकर-पाटील यांची लोकसभा उमेदवारीतून माघार, अशोक चव्हाणांचा मार्ग मोकळा...
- मुंबईतील शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी एका टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना सत्र न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली...
- आपचे राज्यातील आणखी दोन उमेदवार जाहीर, गडचिरोलीतून डॉ. रमेशकुमार गजबे तर हिंगोलीतून विठ्ठल कदम यांना उमेदवारी.
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री व सध्याचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशोबी मालमत्ता कमविल्याप्रकरणी कोर्टाने आज तीन वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा व 1 लाख रूपयांचा दंड ठोठावला...
- गेल्या वर्षी फोटो जर्नालिस्ट तरूणीवर शक्ती मिलमध्ये कामानिमित्त गेली असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार...
- युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी टि्वट करून नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौत लढत असल्याने तेथे शिवसेना उमेदवार देणार नसल्याचे म्हटले आहे. शिवसेनेने मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
- राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला परवानगी दिल्याची राज्याचे मुख्य सचिव जे एस सहारिया यांची माहिती...
- ज्येष्ठ चित्रकार शरद वायकुळ यांचे मुंबईत निधन. वायकुळ यांच्यावर उद्या दादर येथे अंत्यसंस्कार...
- राज ठाकरे- धनंजय मुंडे यांच्या भेटीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन. राजकारणात सगळे डावपेच खेळावे लागतात असे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधवांकडून वक्तव्य...
- राज्यात आणखी दोन शेतक-यांची आत्महत्या : जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातील 58 वर्षीय गारपीटग्रस्त शेतकरी भास्कर पाटील यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. तर, अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील चाकूर गावातील गणेश खंडारे या शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केली. राज्यात आतापर्यंत 40 पेक्षा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.
- पुण्यात काँग्रेसने विश्वजित कदम यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले खासदार सुरेश कलमाडी यांच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष, लोकसभा लढवावी की नाही याचा आज घेणार निर्णय...