आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Local Train Accident Near Dombivali Station, Passenger Kill

VIDEO:लोकलचा प्रवास जीवावर बेतला, धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे उपनगरीय रेल्वेचा प्रवास प्रवाशाच्या जीवावर बेतला आहे. शनिवारी सकाळी डोंबिवलीजवळ एक तरुण धावत्या लोकलमधून खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. भावेश नकाते असे या तरुणाचे नाव आहे. तो दरवाज्याला अक्षरश: लटकून प्रवास करत होता. मात्र, थोड्या अंतरावरच त्याच्या हात सुटला आणि तो खाली पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 8 वाजता कर्जतहून सीएसटीकडे जाणार्‍या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. ऑफिसला निघालेल्या भावेशने डोंबिवली स्टेशनवर धावतपळत पकडली. गर्दीमुळे डब्यात शिरण्याची जागा न मिळाल्याने तो दरवाज्याला लटकला होता.मात्र, मध्य रेल्वेच्या कोपर-दिवा स्थानकादरम्यान त्याचा हात सुटला आणि तो खाली पडला. रेल्वे पोलिसांकडे या अपघातासंबंधिची कोणतीही माहिती नाही. या अपघातमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंब्रा ते कळवादरम्यान वेगवेगळ्या अपघातात एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला होता.

आफताब आलम शेख हा 19 वर्षीय तरुण धावत्या लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाला. अफताबला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुसर्‍या घटनेत रेल्वे ट्रॅकवर एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. या तरुणाला पोलिसांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला पाहाताच मृत घोषित केले. या व्यक्तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

तिसर्‍या घटनेत, मुंब्रा येथील राहाणार शब्बीर हुसेन इमतीयाज मुल्ला या 21 वर्षीय तरुणाचा ओव्हरहेड वायरचा झटका बसून तो जागीच होरपळला होता. शब्बीर हा टपावरुन प्रवास करत होता.

साभार- एबीपी माझा (व्हिडिओ)