आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूळ ओलांडताना लोकलची धडक बसून 13 वर्षीय मुलाचा मृत्‍यू, प्रवाशांचे रेलरोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
मुंबई - मुंबईमध्‍ये पुन्‍हा लोकलखाली सापडून एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भायखळ्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्‍वे रूळावर उतरून रेलरोको केले. भायखळा सीएसटीदरम्‍यानच्‍या वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.
- गौरव व्होरा असे या 13 वर्षीय मुलाचे नाव आहे.
- गौरव सॅंण्डर्हस्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत होता.
- दरम्‍याने लोकलची धडक बसून तो मरण पावला.
- अपघातानंतर गौरवला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
- अपघातानंतर मध्य रेल्वे मार्गावर सँडहर्स्ट रोड स्थानकात प्रवाशांनी संताप व्‍यक्‍त केला.
रेल्‍वेब्रिजची मागणी....
- हा मुलगा शाळेतून घरी येत होता. त्‍यावेळी ही घटना घडली.
- घटनास्‍थळी आंदोलन करत स्‍थानिक नागरिकांनी ब्रिजची मागणी केली.
- यापूर्वीही रेल्वेब्रिज नसल्‍याने रुळ ओलांडताना अनेक बळी गेले आहे, असे स्‍थानिकांचे म्‍हणने आहे.
- दरम्‍यान संतप्‍त आंदोलकांना रूळावरून हटवण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चिमुरडा ओलांडत होता रेल्वे रुळ, तेवढ्यात आली लोकल..