मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसटी) प्रवेश करत असताना लोकल ट्रेनचे दोन डबे घसरले आहेत. यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातात झालेल्या हानीची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरील वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वळविण्यात आली आहे.
आज रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे स्थानकांवर फार गर्दी नाही. हार्बर मार्गावरील काही स्थानकांवर आज मेगा ब्लॉक आहे. त्यातच या अपघातामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.