आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Local Train Derails On Central & Western Suburban

मुंबई: मध्य, पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक तांत्रिक कारणाने विस्कळित, प्रवाशांचा खोळंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई लोकल रेल्वे सेवेने आज चाकरमान्यांना दगा दिला. तांत्रिक कारणामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच विस्कळित झाली. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
आज सकाळी प्रथम मध्य रेल्वेच्या मार्गावर गडबड झाली. आसनगाव स्थानकाजवळ एका मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळित झाली तर कर्जत-खोपोली मार्गावर पळसदरी स्थानकावर वायरहेड तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने मार्ग ठप्प झाला. आसनगावात बंद पडलेल्या मालगाडीचे इंजिन बदलण्यात तासाभरात यश आले मात्र पळसदरीदरम्यान वायरहेड जोडणीस उशिर झाला. त्यामुळे मुंबहूकडून खोपोलीकडे जाणा-या गाड्या बंद ठेवल्या गेल्या. आता वाहतूक सुरळित झाली असून मध्य रेल्वेच्या गाड्या 20 - 25 मिनिटांनी उशिराने धावत आहेत.
पश्चिम मार्गावर बोईसर व पालघरदरम्यान तांत्रिक कारणामुळे डहाणूवरून चर्चकडे जाणा-या गाड्याची वाहतूक विस्ळकित झाली. यामुळे लोकल गाड्यांसह एक्स्प्रेस गाड्याही लटकल्या होत्या. अखेर दुपारनंतर ही सेवा सुरळित झाली. मात्र येथेही मध्य रेल्वेप्रमाणे 20-25 मिनिटांनी सर्व गाड्या उशिरा सोडल्या जात आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेची एकाच दिवशी त्याच वेळेत वाहतूक विस्कळित झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. बहुतांश रेल्वे व बस स्थानकावर त्यामुळे गर्दी दिसून येत होती. चाकरमान्यांचे हाल होताना दिसले.