आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Lonavala Sea Plane Service Launched Today

PHOTOS: मुंबई-लोणावळा सी-प्लेन सेवा सुरु, 25 मिनिटांत होणार प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सी प्लेन सेवेचे संग्रहित छायाचित्र)

पुणे/मुंबई- गेल्या काही वर्षांपासून ज्या सी प्लेन (पाण्यासह हवेतून उडणारे विमान) सेवेची पुणे-मुंबईतील लोक आतुरतेने वाट पाहत होते त्यांची इच्छापूर्ती अखेर आजपासून होत आहे. आजपासून राज्यात अधिकृतरित्या सी-प्लेन सेवा सुरु होत आहे. मुंबईतील जुहू बीचपासून उड्डाण होणार असून लोणावळ्यातील पवना डॅम येथे हे विमान उतरेल. सी-प्लेन विमान हे अंतर केवळ 30 मिनिटांत कापेल. मुंबईहून लोणावळ्याला रस्त्याने जाण्यास सुमारे अडीच तास लागतात.
या सी-प्लेनद्वारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यंटनस्थळे जोडली जाणार आहेत. गोवा, शिर्डी, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणी ही सेवा सुरु करण्याचा विचार आहे. शिर्डीची सेवा लागलीच सुरू होणार आहे. सी प्लेनमध्ये एका वेळीस 9 व्यक्ती बसू शकतात. तसेच यासाठी प्रतिव्यक्ती सुरुवातीला 2,999 रुपये भाडे ठेवले आहे. ही सेवा मेरीटाइम एनर्जी हेली एयर सर्विसेज प्राइवेट लिमिटेडने उपलब्ध करून दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या सहकार्याने ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. यापूर्वी याच कंपनीने जानेवारी 2011 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.

सी प्लेन सेवा प्रकल्पासाठी राज्य सरकारने पोर्ट ट्रस्टच्या सुमारे 1, 800 एकर जमिनीचे अधिग्रहण केले आहे. या जमिनीची बाजारातील किंमत 75 हजार कोटी रूपये इतकी प्रचंड आहे. मुंबई-लोणावळानंतर ही सेवा मुंबई ते शिर्डी अशी लागलीच सुरु होणार आहे. सी-प्लेन सेवेसोबत येणा-या काही दिवसात राज्य सरकार मुंबई व कोकणातील समुद्रात व त्याच्या किनारी तरंगणा-या 5 स्टार हॉटेल आणि रेस्टोरेंट खोलणार आहे.

पुढे स्लाईडद्वारे पाहा या 'सी प्लेन'ची सेवेची छायाचित्रे आणि जगभरातील काही प्रसिद्ध सीप्लेनची छायाचित्रे...