आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Mahalaxmi Race Course Land Issue Congress Vs Shiv Sena

‘रेसकोर्सवर चालणारा सट्टा हा काँग्रेसच्या विचारात बसत नाही’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या मागणीला राज्य सरकारमधून विरोध होत असतान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मात्र रेसकोर्स नको असल्याचे सांगत शिवसेनेच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला.
‘रेसकोर्सवर चालणारा सट्टा हा काँग्रेसच्या विचारात बसत नाही,’ असे सांगून त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली. मात्र लगेचच स्वत:ला सांभाळत त्यांनी याबाबत सरकारच निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.

‘रेसकोर्स कायम ठेवण्याला काँग्रेसचा विरोध असून शहरांत मोकळ्या जागा आणि मैदानांची गरज आहे,’ असे ठाकरे म्हणाले. याच वेळी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी त्यांना काही तरी सांगितले. त्यानंतर ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील, आतापासून चर्चा कशाला’, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये जवळीक नाही. उलट जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेशी हातमिळवणी केल्याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.

सरकारविरोधी भूमिका
थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रेसकोर्स कायम ठेवावा अशीच भूमिका घेतली आहे. असे असताना माणिकराव ठाकरे यांनी मात्र सरकारविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.