आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Man Sentenced To Death By Firing Squad In Dubai

पत्नीची हत्या करणाऱ्या युवकाला मिळाली गोळी घालून ठार करण्‍याची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतिफ पोपेर  आणि बशरा (फाइल फोटो) - Divya Marathi
आतिफ पोपेर आणि बशरा (फाइल फोटो)
मुंबई - मुंबईतील आतिफ पोपेर नावाच्‍या युवकाने दुबईमध्‍ये आपली पत्‍नी बशरा (वय24) हिची हत्‍या केली. या प्रकरणी दुबईतील न्‍यायालयात त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा सिद्ध झाला असून, न्‍यायालयाने त्‍याला गोळीमारून ठार करण्‍याचा आदेश दिला आहे. दरम्‍यान, जर त्‍याच्‍या सासू-सासऱ्याने माफ केले तर त्‍याची शिक्षा जन्‍मठेपेत बदलू शकते. त्‍यामुळे आपण तसे करावे, यासाठी आतिफ आपल्‍यावर दबाव आणत असल्‍याचा आरोप मृताच्‍या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष आतिफ आणि बशरा यांचा प्रेमविवाह होता.
कशी केली आतिफने हत्या....
वर्ष 2013 मध्‍ये आतिफ पोपेर याने आपल्‍या मित्राच्‍या मदतीने पत्‍नी बशरा हिची गळाघोटून हत्या केली होती. या नंतर पोलिसांनी त्‍याला अटक केली.
दुबईमध्‍ये झाला होता स्‍थायिक
मंटुगा कॉलेजमध्‍ये आतिफ पोपेर मिनी (बशरा) यांचे प्रेम जुळले होते. वर्ष 2008 मध्‍ये दोघांनी लग्‍न केले. त्‍यानंतर आतिफने तिचे नाव बदलून ते बशरा ठेवले. पुढे हे दाम्‍पत दुबईमध्‍ये स्‍थायिक झाले. त्‍या ठिकाणी आतिफ एका दुकानात व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करत होता. दरम्‍यान, वर्ष 2009 मध्‍ये त्‍यांना एक मुलगी झाली. वर्ष 2012 मध्‍ये त्‍याने तिला रायगड येथे राहणाऱ्या आपल्‍या आई-वडिलांकडे पाठवले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO...