आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथयात्रा काढणार, मराठा ग्रामसभाही; मोर्चांच्या निमित्ताने समाजाचा मुंबईत दोन दिवस ठिय्या !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यभर मराठा मोर्चांची लाट आली असताना मुंबईत हा मोर्चा कधी व केव्हा होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आजवरच्या सर्व मोर्चांसारखे एक दिवसाचे आंदोलन हे स्वरूप न ठेवता राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी किमान दोन दिवस मुंबईतच ठाण मांडून बसण्याबद्दल मराठा समाज गंभीरपणे विचार करत आहे. राज्यभरातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होत असून मुंबईच्या मोर्चाचे नियोजन यावेळेस अंतिम केले जाणार आहे.
या मोर्चात किमान १ कोटी मराठ्यांना मुंबईत आणण्याचे लक्ष्य असल्याने अतिविराट जनसागर मुंबईत ठाण मांडून बसल्यास मुंबई पूर्णत: ठप्पच होण्याची शक्यता आहे. मुंबईचा मोर्चा दिवाळीपूर्वी काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सर्वच जिल्ह्यांत मूकमोर्चे काढून झाल्यानंतर एखाद्या रविवारी मुंबईत मोर्चा काढला जावा, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे हा मोर्चा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुंबईत केवळ एक दिवस आले, मोर्चा काढला आणि निघून गेलोत, असे होऊ नये. आपल्या मागण्यांसाठी मुंबईतच किमान २ दिवस ठाण मांडून बसण्याचा आग्रह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा आहे, असे या नियोजन प्रक्रियेतील एका प्रमुख व्यक्तीने सांगितले.
रथयात्राही निघणार : एकेकाळी रथयात्रा खूप गाजल्या होत्या. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे किंवा भावनांच्या आधारावर राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचे हे अस्त्र मानले जायचे. आता मराठा समाजही रथयात्रा काढण्याच्या विचारात आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राज्यभर रथयात्रा काढली जाईल,असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रया रथयात्रा नियोजनाच्या तयारीत असलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले.
प्रत्येक गावात मराठा ग्रामसभा
मराठा समाजाची एकी केवळ मोर्च्यापुरती राहू नये, यासाठी कायमस्वरूपी संघटनात्मक रचना उभी केली जाईल. प्रत्येक गावपातळीवर ‘मराठा ग्रामसभा’ स्थापन केली जाईल. संघटनेच्या कार्यालयावर याच नावाची पाटी असेल. पाटीवर कोणत्याही व्यक्तीची नावे नसतील.
बातम्या आणखी आहेत...