आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या सागरी किनाऱ्यावरून रस्ते प्रवासाचा अानंद लुटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई सागरी मार्गास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने साेमवारी मंजुरी दिली. १५ जूनपर्यंत या मार्गाचा मसुदा अध्यादेश १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत अंतिम अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, ‘एमएमआरडीए’चे आयुक्त यू. एस. मदान, मुंबई पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी हाेईल. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक ही पश्चिम एक्स्प्रेसहून होते. सागरी मार्गामुळे पश्चिम एक्स्प्रेसवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. पर्यावरणाचे संतुलन राखत या प्रकल्पांतर्गत मुंबईत ९१ हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे.
समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाही याची दक्षता राज्य सरकार घेणार आहे. केवळ वाहतुकीचा ताण कमी करणे आणि हरित क्षेत्र तयार करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग हाेईल. सागरी मार्ग ही केंद्र सरकारने मुंबईकरांना भेट िदली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणासाठी सागरी मार्ग महत्त्वाचा
पर्यावरणाच्यादृष्टीने सागरी मार्ग महत्त्वाचा असून नियम कायदे पर्यावरणाची काळजी घेऊन आठवडाभरात अध्यादेश आणणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. त्यानंतर काही सूचना आल्या तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण आणि प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा ‘ड्रीम प्राेजेक्ट’ भाजपकडून हायजॅक
मुंबई - शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या सागरी मार्गाला मंजुरी देत अखेर भाजपने त्याचे श्रेय घेतले अाहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट'मधून ‘किनारपट्टी रस्ता'चे स्वप्न दाखवले होते. मात्र, भाजपने पुढाकार घेऊन दिल्लीत बैठक घेऊन तातडीने हा प्रकल्प मंजूर करून घेतला. दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र युतीत श्रेयाचा कोणताही वाद नसल्याचे म्हटले अाहे. उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकली आहेत. मुंबईकर जनतेचा त्यात फायदा होणार आहे, असे त्या म्हणाल्या.
असा असेल सागरी मार्ग
सागरी मार्गाचे अंतर ३४ किलोमीटर
वेस्टर्नलाइनवर नरिमन पाॅइंट, कांदिवली भागातून जाणार प्रस्तावित सागरी मार्ग
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
येत्या पाच ते सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे सरकारचे ध्येय
या प्रकल्पाद्वारे ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव
गर्दीच्या ठिकाणी होणारी गैरसोय टाळण्याकरिता सागरी मार्गात ठिकाणी आंतरसमुद्री बोगदे तयार करण्यात येतील
या प्रकल्पांतर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार