Home »Maharashtra »Mumbai» Mumbai Mayor Appeals To Protesting Doctors To Resume Work

राज्यभरातील 4000 डाॅक्टरांच्या ‘काम बंद’मुळे रुग्णांचे हाल; मंत्र्यांकडून सुरक्षिततेची हमी

विशेष प्रतिनिधी | Mar 21, 2017, 08:27 AM IST

  • मुंबईतील केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांनी साेमवारी प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविराेधी निदर्शने केली.
मुंबई/ नाशिक-धुळे, मुंबई, नाशिक व अाैरंगाबादेत डाॅक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या ‘मार्ड’ संघटनेच्या राज्यभरातील सुमारे ४ हजार निवासी डॉक्टरांनी साेमवारी सामूहिक रजा टाकून काम बंद अांदाेलन केले. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत अाणखी ११०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असे अाश्वासन देत अांदाेलन मागे घेण्याचे अावाहन डाॅक्टरांना केले.
दुसरीकडे, अांदाेलनकर्त्या डाॅक्टरांना ताबडताेब कामावर रुजू हाेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडवीय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर मंगळवारी सुनावणी हाेण्याची शक्यता अाहे.
या अांदाेलनाचा औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरातील सर्व सरकारी रुग्णालयातील हजाराे रुग्णांना फटका बसला. अनेक शस्त्रक्रियाही खाेळंबल्या. निवासी डाॅक्टरच कामावर हजर नसल्यामुळे बहुतांश सरकारी रुग्णालयांचे प्रवेशद्वार बंद करून रुग्णांना बाहेरच अडवण्यात अाले हाेते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी डाॅक्टरांविराेधात तीव्र संताप व्यक्त केला. तर रुग्णालयाबाहेर निदर्शने करून निवासी डाॅक्टरांनी अापल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अांदाेलन मागे घेण्याचे अावाहन
‘मार्ड’च्या मागण्या
-डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट २०१० ची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी
- डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई
- निवासी डॉक्टरांच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा रक्षक वाढवावेत.
- रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
राज्यातील डाॅक्टरांची रिक्त पदे भरणार : गिरीश महाजन
डाॅक्टर नसल्याने, उपचारास विलंबामुळे हल्ले हाेत अाहेत. त्यामुळे डाॅक्टरांच्या रिक्त जागा भरू. निवृत्त पाेलिस महासंचालकांद्वारे सरकारी रुग्णालयात ११०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. सेवानिवृत्त पाेलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील समिती चाैकशी करेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले.
‘मार्ड’ने गतवर्षी म्हटले होते, यापुढे संप करणार नाही !
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल हाेत असल्याने गतवर्षीच ‘मार्ड’विरोधात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर ‘निवासी डॉक्टर यापुढे कधीच संपावर जाणार नाहीत’, अशी ग्वाही ‘मार्ड’ने काेर्टात दिली होती. मात्र कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून अाजच्या अांदाेलनाला संप म्हणण्याऐवजी ‘सामूहिक रजा ‘असे नाव देण्यात अाले.
पुढील स्लाइडवर वाचा...मार्डच्या आंदोलनाचा राज्यभारातील रुग्नालयात काय परिणाम झाला....
>तत्काळ कामावर रुजु व्हा, मुंबईच्या महापौरांचा डॉक्टरांना इशारा...
> औरंगाबाद: मार्डच्या रजा आंदोलनाचा घाटीतील रुग्णसेवेवर परिणाम नाही...
> सोलापूर: खासगीतही ‘ओपीडी’ बंद, केवळ तत्‍काळ सेवा सुरु...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended