आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी सरकारची कार्यशैली हिटलरप्रमाणे- महापौर स्नेहल आंबेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौर स्नेहल आंबेकर (फाईल फोटो) - Divya Marathi
महापौर स्नेहल आंबेकर (फाईल फोटो)
मुंबई- नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मी आदर करते. मात्र मला कधी कधी मोदी सरकारची कार्यशैली हिटलरप्रवृत्तीची वाटते. सर्व सत्ता जेव्हा एका हातात एकवटली जाते तेव्हा असं होतच असतं, अशी टीका शिवसेनेच्या मुंबईतील महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली आहे.
स्नेहल आंबेकर यांनी 'दि आफ्टरनून' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजप आणि शिवसेनेचे संबंध सध्या ठीक नसताना आंबेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप दुखावला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना जशी लाल दिव्याची गाडी दिली असते तशीच ती महापौरालाही दिले पाहिजे. कारण मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात तसाच प्रत्येक महापौर हा त्या त्या शहराचा प्रमुख असतो. त्यामुळे तो मुख्यमंत्र्यांप्रमाणेच असतो असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आंबेकर यांच्या वक्तव्याला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. भाजपने 2017 ची मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेशिवाय लढण्याचे अनेकवेळा संकेत दिले आहेत. असे असले तरी महापौर आंबेकरांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट जर्मनीचा माजी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केल्याने शिवसेना-भाजपात आता नवा 'सामना' रंगण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, आंबेकरांची प्रकाशित झालेली मुलाखत...
बातम्या आणखी आहेत...