आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईचे महापौर म्हणाले, ब्राझील टीमसोबत मेजवानी झालीच नाही फक्त भेट घेतली; शेलारांवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ब्राझील टीमसोबत मेजवानी झालीच नाही तर फक्त भेट झाल्याचे सांगितले आहे. - Divya Marathi
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ब्राझील टीमसोबत मेजवानी झालीच नाही तर फक्त भेट झाल्याचे सांगितले आहे.
मुंबई- मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ब्राझील टीमसोबत मेजवानी झालीच नाही तर फक्त भेट झाल्याचे सांगितले आहे. एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. मात्र महापौर त्याच दिवशी मेजवाणी होते असा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन महाडेश्वर यांनी माहिती दिली. 
 
पाहुण्यासोबत फक्त स्नॅक्स आणि चहा
पाहुणा आल्यावर घरी आल्यावर आपण त्याचे स्वागत करतो. मुंबईचा महापौर म्हणून त्यांचे स्वागत केले. तिथे कोणत्याही प्रकारची मेजवानी किंवा पार्टी नव्हती. रोषणाई नव्हती, बडेजाव नव्हता. कोणतेही नृत्य नव्हते, काहीही नव्हते. इथे आम्ही त्यांना फक्त स्नॅक्स आणि चहा दिला. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. ते निघत असताना, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे इथे आले आणि त्यांना भेटले, असे महापौरांनी सांगितले.
 
शेलारांवर जोरदार टीका
भाजप नेते आशिष शेलार यांनी जाणीवपूर्व आरोप केले, कारण त्यांच्या पक्षाचे किरीट सोमय्या दुर्घटनेच्या संध्याकाळी दांडिया रासमध्ये थिरकत होते, असा पलटवारही त्यांनी केला. त्यांच्या पक्षाप्रमाणेच इतर पक्षातही असंवेदनशील नेते आहेत, असे कदाचित आशिष शेलार यांना वाटत असेल असा चिमटाही त्यांनी काढला. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...