आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Metro Celebrates Metro Day On His First Anniversary Day

मेट्रो दिन: मुंबई मेट्रोचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा, पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध कार्यक्रम व उपक्रमासह मुंबईकरांनी आपल्या लाडक्या मेट्रोचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. - Divya Marathi
विविध कार्यक्रम व उपक्रमासह मुंबईकरांनी आपल्या लाडक्या मेट्रोचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
मुंबई- मुंबईकरांना सुखद व थंडगार प्रवासाचा अनुभव देणारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबई 'मेट्रो-1'चा पहिला वाढदिवस आज मेट्रो दिन म्हणून धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 8 जून 2014 रोजी मुंबईत मेट्रो सुरु झाली होती. त्यामुळे मुंबईकर आपल्या लाडक्या मेट्रोचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसत आहेत.
वर्सोवा ते घाटकोपर हे 11 किलोमीटरचे अंतर कापताना गेल्या वर्षभरात 9. 20 कोटी मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मुंबई मेट्रोने रोज सरासरी 2 लाख 60 हून अधिक प्रवासी प्रवास करतात. पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणा-या मेट्रोने वर्षभरात 14 लाख किलोमीटर अंतर कापले आहे तर 1 लाख 32 हजाराहून अधिक फे-या मारल्या आहेत.
आज सकाळपासून सर्व मेट्रो रेल्वे सजवलेल्या दिसत आहेत. आज आठवड्याचा पहिला (वर्किंग डे) दिवस आहे. त्यामुळे मेट्रो नेहमीप्रमाणेच गजबजलेली दिसत होती. शनिवार व रविवारची सुट्टी लक्षात घेऊन मुंबई मेट्रोने 'जॉय राईड'चा उपक्रम राबविला. रविवारी मुंबईतील 'विशेष' मुलांसाठीच्या एका शाळेतील विद्यार्थी व पालकांसाठी आणि दोन वृद्धाश्रमांतील वृद्धांसाठी खास 'जॉय राईड' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुंबई 'मेट्रो' आपला वाढदिवस यापुढे दरवर्षी 'मेट्रो दिन' म्हणून साजरा करणार आहे. यंदाही पहिल्याच 'मेट्रो दिना'ची धामधूम शनिवारपासूनच सुरू झाली आहे. आजही (सोमवार) प्रवाशांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. अंधेरी आणि घाटकोपर या दोन प्रमुख स्थानकांवर प्रवाशांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मुंबई मेट्रोची वैशिष्टयांची माहिती देण्यात आली आहे.
वर्सोवा ते घाटकोपर हे 11 किलोमीटरचे अंतर रस्त्याने पार करण्यासाठी मुंबईकरांचा किमान तास-दीड तास खर्च करावा लागत होता. मात्र 'मेट्रो-1' सुरू झाल्यापासून हे अंतर केवळ 24 मिनिटांत कापणे शक्य झाले आहे. त्यामुळे मेट्रो सुरु झाल्याच्या पहिल्या दिवासापासून (8 जून) मुंबई मेट्रो मुंबईकरांची पसंतीस उतरली आहे. मेट्रोला पहिल्या दिवसापासूनच मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून मुंबई मेट्रोचा पहिला वाढदिवस कसा साजरा करण्यात आला....