आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो दरवाढीने मुंबईकरांचे कंबरडे मोडणार; तिकीट दरात 110 रुपयांपर्यंत वाढ होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अवघ्या काही दिवसात मुंबईकरांची लाडकी राणी बनलेल्या मुंबई मेट्रोची दरवाढ करण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुंबई मेट्रोचा प्रवास तिपटीने महागणार आहे. तर, तिकीट दरात 10 रुपयांपासून 110 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. आगामी तीन महिन्यानंतर रिलायन्स कंपनी ही वाढ करू शकणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा कापला जाणार असून, मेट्रो प्रवास सामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊन केवळ श्रीमंतापुरताच उरणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई मेट्रो तिकीट दरवाढ समितीने काही दिवसापूर्वी तिकीट दरात 10 ते 110 रूपयांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर रिलायन्स कंपनीने ऑक्टोबरनंतर ही दरवाढ केली जाईल असे जाहीर केले होते. समितीच्या शिफारशीनंतर मुंबई मेट्रोने तीन महिन्यानंतरचे प्रस्तावित तिकीट दर आपल्या वेबसाईटवर जाहीर केले होते. मात्र, या प्रस्तावित तिकीट दर वाढीच्या विरोधात सर्वप्रथम एमएमआरडीएने आक्षेप नोंदवला. राज्य सरकारनेही एमएमआरडीएची बाजू घेत दरवाढीला विरोध केला. याविरोधात रिलायन्स कंपनी प्रथम हायकोर्टात व नंतर सुप्रीम कोर्टात गेली. अखेर रिलायन्स कंपनीला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दरवाढीचा प्रस्ताव योग्य असल्याचे सांगितले.

प्रस्तावित नवीन दरांनुसार मुंबई मेट्रोचा प्रवास हा तिपटीने महागणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा या प्रवासासाठी प्रवाशांना 110 मोजावे लागणार आहेत. आता हे दर 40 रूपये इतका आहे. तर, घाटकोपर ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे प्रवासासाठी प्रवाशांना 70 रुपये मोजावे लागणार आहेत. जो आता 30 रूपये आहे.
बातम्या आणखी आहेत...