आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मेट्रोचा खर्च 84 टक्क्यांनी वाढला, माहिती अधिकारात उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पहिली मेट्रो रेल्वे मुंबईत सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सात वर्षे झाली तरी मेट्रोबाबत उदासीनता दिसून येत आहे. मात्र, मेट्रोच्या खर्चात तब्बल 84 टक्के वाढ झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. काम सुरू झाले तेव्हा प्रकल्पाची किंमत 2356 कोटी होती ती आता 4321 कोटींवर गेल्याचे ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

मुंबईतील मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले आहे. गलगली यांनी 2 मे रोजी एमएमआरडीएकडे मूळ खर्च आणि वाढलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. यानुसार मूळ प्रकल्पाची किंमत 2356 कोटी रुपये होती. मे 2012 मध्ये महिन्यात संचालक मंडळाच्या बैठकीत एकूण खर्च 4321 कोटी रुपये मांडल्याचे नमूद करून प्रकल्पाच्या वाढीव खर्चामध्ये प्राधिकरण, राज्य शासनाच्या समभागाच्या हिश्श्यामध्ये कोणतीही वाढ नसल्याचेही माहितीत नमूद करण्यात आले आहे.

रिलायन्ससमोर अडचण
प्रकल्पाचा खर्च वाढल्याने आणि त्याचा संपूर्ण भार एमएमओपीएल (रिलायन्स) वर पडणार असल्याने त्यांनी तिकीटांचे दर वाढवून देण्याची विनंती एमएमआरडीएला केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी तिकिटांचे दर कोणत्याही परिस्थितीत वाढवले जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने रिलायन्ससमोर वाढीव खर्च कसा भागवायचा असा प्रश्न पडल्याची माहिती मेट्रो वनमधील अधिकार्‍याने दिली.